अर्जुन रावराणे विद्यालय व श्री.जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे एस. एस. सी. परीक्षेत उज्ज्वल यश.

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१० वी) बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. वैभववाडी तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलचे ४९ विद्यार्थी एस.एस.सी. मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

प्रशालेची विद्यार्थीनी कु.मानसी अरविंद चव्हाण हिने ९६.८०% गुण मिळवत प्रशालेत प्रथम क्रमांक तर कु. प्रिती नितीन रावराणे हिने ९६.६० % गुण मिळवत प्रशालेत द्वितीय येण्याचा मान मिळविला आहे. तर कु.वैष्णवी भास्कर नादकर हिने ९५.८०% गुण मिळवत प्रशालेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील शिक्षकांचे प्रशालेचे स्थानिक अध्यक्ष तथा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व मुख्याध्यापक बी.एस.नादकर, संचालक शरद नारकर, विजय रावराणे, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!