भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके विद्यालयाचा दहावीचा निकाल १००%

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके विद्यालयाचा सन 2023 – 24 माध्यमिक शालांत परीक्षा निकाल शंभर टक्के लागला. यावर्षी प्रशालेतून एकूण 43 विद्यार्थी परीक्षेसाठी समाविष्ट झाले होते. ते सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी कुमारी उन्नति कृष्णा परब – (87.00%) हिने प्रथम, कुमारी. भार्गवी रमेश पाटकर आणि कु. जय विश्वनाथ चव्हाण- (86%) यांनी द्वितीय तर कु. ओमकार विजय चव्हाण (85.60%) याने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चौके स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, सर्व संस्था पदाधिकारी , मुख्याध्यापिका रसिका गोसावी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!