फाेंडाघाट (प्रतिनिधी) : अ.वि. फडणीस माध्यमिक विद्यामंदिर घाेनसरीचा शालांत प्रमाणपत्र परिक्षा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असुन प्रशालेत एकूण २२ विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.यात प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे- प्रथम क्रमांक कु. काजल पांडुरंग जाधव ८४.८0 टक्के, द्वितीय-कु. प्रियशा राजेंद्र राणे ८१.४0 टक्के, तृतीय- तन्वी संतोष आचरेकर ७७.०० टक्के.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे घोणसरी ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, सर्व संचालक मंडळ व सदस्य तसेच शालेय समिती चेअरमन व सर्व सभासद आणि मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले











