कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कलमठ गावातील प्रशांत दयानंद पाष्टे ( वय 27 , लांजेवाडी ) याने आपल्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केली. प्रशांत हा आपल्या लांजेवाडी येथील दुकानात रोज रात्री झोपत असे. त्याप्रमाणे काल 27 मे रोजी प्रशांत दुकानात झोपायला गेला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह दुकानात आढळून आला. दुकानाच्या छप्पर च्या लोखंडी अँगलला त्याने गळफास लावून घेतला होता. प्रशांत ला व्यायामाची आवड होती. शरीर सौष्ठव स्पर्धेतही तो सहभागी होत असे. प्रशांत च्या आत्महत्येची घटना समजताच त्याच्या कुटुंबियांसह कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. हवालदार देसाई, कॉन्स्टेबल स्वप्नील ,यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पश्चत आई वडील आजी बहीण भाऊ असा परिवार आहे.
कलमठ मधील युवकाची गळफास लावून आत्महत्या










