खारेपाटण येथे सयुंक्त जयंती महोत्सव साजरा

भव्य रॅली मध्ये नागरिकांचा सहभाग

पुणे करार – चित्ररथ ठरला आकर्षण

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारात विश्ववंदनिय तथागत भ.गौत्तम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजेश्री छ.शाहू महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर या महामानवांचा सयुंक्त जयंती महोत्सव नुकताच उस्ताही व आनंदी वातावरणात संपन्न झाला. तर या जयंती उस्तव कार्यक्रमा निमित्त काढण्यात आलेली भव्य रॅली मध्ये नागरिकांनी मोठ्या सख्येने सहभाग घेतला होता तर रॅली मध्ये काढण्यात आलेला पुणे करार वर आधारित चित्ररथ सर्वांचे आकर्षण ठरला.

प्रारंभी सकाळी संघटनेचे कार्यकर्ते अजित पगारे यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजारोहण करून कार्यक्रमांची सुरवात करण्यात आली.यानंतर खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ.बाबसाहेब अबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पंचशील विकास मंडळ खारेपाटण, मुंबई शाखेचे उपाध्यक्ष विनोद पाटणकर व खजिनदार दिनेश पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या अध्यक्षा आंकशा पाटणकर व महिला भगिनीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

यावेळी खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहारात संयुक्त जयंती निमित्त सर्व महामानवांच्या प्रतिमेला मान्यवराच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर पंचशील विकास मंडळाचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक बौद्ध धम्म पूजा पाठ घेण्यात आला. यामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, महाराष्ट्रचे सुप्रसिद्ध ढोलकपटू प्रभाकर मोसमकर, धनंजय मोसमकर, खारेपाटण हायस्कूलच्या माजी शिक्षिका स्वप्नाली कांबळे मॅडम यांनी सदिच्छा भेट देऊन बुद्ध पौर्णिमा व जयंती निमित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी खारेपाटण पंचशील नगर,बुद्धविहार ते खारेपाटण एस टी बस स्थानक ते खारेपाटण बाजारपेठ मार्गे घोडेपाथर बंदर पर्यंत संयुक्त जयंती निमित्त महामनवांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक तथा रॅली ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. तर या रॅलीत दाखवण्यात आलेला “पुणे करार” वर आधारित चित्ररथ देखावा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. खारेपाटण बाजारपेठांत काढण्यात आलेल्या या भव्य रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. जयभीम च्या नाऱ्यानी संपूर्ण परिसर दणाणून सोडण्यात आला.

या जयंती उस्तव निमित्त महिलांसाठी भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आस्था भूपेश पाटणकर (प्रथम) संकिता संतोषन पाटणकर (द्वितीय) सारिका स्वप्नील भोसले(तृतीय), ऋतुजा राजन पाटणकर व सारंगी संदीप पाटणकर यांनी उत्तेजनार्थ अनुक्रमे क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची पारितोषिक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले. तर लहान मुलांचे विविध फानिगेम देखील यावेळी घेण्यात आले. यातील विजेत्या स्पर्धकांना मंडळाच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या संयुक्त जयती मोहस्तव निम्मित खारेपाटण पंचशील नगर येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.नृत्य दिग्दर्शक योगेश पाटणकर व आशिष पोमेडकर यांच्या संकल्पनेतून पंचशील नगरातील मुलांनी बहारदार संगीत नृत्याचा कार्यक्रम सादर केला. याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी संयुक्त जयंती महोत्सव कमितीची स्थापना मंडळाच्या वतीने करण्यात आली होती. त्यांच्या योग्य नियोजनमुळे कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा कार्यकर्ते मकरंद पाटणकर, भूषण गोवळकर, पार्थिव पाटणकर, विराज पाटणकर, ललित पाटणकर, कुणाल पाटणकर, सर्वेश पाटणकर, प्रणय पाटणकर, अमित पाटणकर, बाळकृष्ण पाटणकर, हर्षल कदम तसेच मंडळाचे कार्यकर्ते योगेश पाटणकर, संदीप पाटणकर, संतोष जुवाटकर, अशोक पाटणकर, प्रथमेश कदम,सागर पोमेडकर, प्रकाश पाटणकर धीरज जुमलेकर, भरत पाटणकर यांनी परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष पाटणकर यांनी केले.

error: Content is protected !!