सिंधुदुर्ग विज ग्राहक संघटनेचा इशारा; कणकवलीत महावितरण अभियंता सोबत बैठक
कणकवली (प्रतिनिधी) : अवकाळी पाऊस, वादळ यामुळे जिल्ह्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यात व्यापारी वर्गाचे व ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे येत्या पाच दिवसात सर्व वीज समस्या सोडविण्याची कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आज देण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष दादा कुलकर्णी यांच्यासह व्यापारी संघाचे नितीन वाळके, राजेश राजाध्यक्ष, महेश नार्वेकर, एडवोकेट नितीन म्हापणकर, एडवोकेट नंदन वेंगुर्लेकर, संजय गोरुले, समीर म्हाडगुत, विलास कोरगावकर आदींनी आज महावितरणाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची भेट घेतली.
या चर्चेत वारंवार खंडित होणाऱ्या विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली. वीज समस्या मार्गी लावण्याबाबत महावितरण विविध उपायोजना करणार आहे. तशी ग्वाही देखील अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिल्याची माहिती नितीन वाळके यांनी यावेळी दिली मात्र खंडित वीजपुरवठ्याची समस्या पुन्हा निर्माण झाली तर वीज ग्राहक संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन केले जाणार आहे. असे वाळके म्हणाले दरम्यान, तीन तासापेक्षा जास्त काळ वीज पुरवठा बंद राहिला तर ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यानुसार ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा तीन तासापेक्षा अधिक काळ खंडित झाला असेल अशा ग्राहकाने नियमक आयोगाकडे अपील करावेत त्यासाठी वीस ग्राहक संघटनेच्या माध्यमातून ऍडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर आणि एडवोकेट नितीन म्हापणकर ग्राहकाची बाजू मांडतील अशीही माहिती श्री वाळके यांनी दिली
तिलारी सह दोडामार्ग तालुक्यात धरणाच्या पाण्यावर ४० मेगावँट पेक्षा जास्त वीज निर्मिती होते. यातील 95 टक्के वीज ही कर्नाटक राज्यात पाठवली. जाते ही वीज सिंधुदुर्गाला मिळाली अशीही आमची मागणी आहे एडवोकेट नितीन म्हापणकर यावेळी म्हणाले दरम्यान मालवण शहराला कुडाळ येथून विज पुरवठा होतो ही 33 केव्हीची वीज वाहिनी भूमिगत होणार आहे येत्या 18 महिन्यात हे काम पूर्ण होईल भूमिगत वीज वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर मालवणला वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार निश्चितपणे थांबतील अशी माहिती यावेळी कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली










