जमीन गैरव्यवहार आर्थिक फसवणूक गुन्ह्यात आरोपीला जामीन मंजूर

मालवण (प्रतिनिधी) : आडवली घाडीवाडी येथील त्रयस्थ व्यक्तीच्या मालकीची जमीन स्वतः मालकीची असल्याचे भासवून व तसा नावाचा खोटा सातबारा तयार करून बनावट सातबाराच्या आधारे फिर्यादीस में दुय्यम निबंधक कार्यालयात साठेकरार लिहून देऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचे कामी आडवली ता. मालवण येथील आरोपी क्र. । विनोद विवेक लाड वय 44 वर्षे याची मे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांनी रक्कम रु 15,000/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. स्वरुप नारायण पेई व अॅड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!