जीवन आनंद संस्था आश्रमांसारखे कार्य समाजात अपरिहार्य-वीणा गवाणकर,सुप्रसिध्द साहित्यिका
मानसिक आरोग्य व आत्महत्येसारख्या प्रश्नावर बी पाँझिटिव्ह नाटकाने वसईकरांची मनं जिंकली
खारेपाटण (प्रतिनिधी) : “संदिप परब व त्यांची जीवन आनंद संस्थेची टिम अत्यंत सह्दयतेने निराधार वंचितांच्या सेवेचे कार्य करते.समाजात आश्रमांची संख्या वाढू नये हे खरे असले तरी त्यांचे कार्य आजच्या स्थीतीत समाजासाठी अपरिहार्य आहे. आपण समाजातील नागरिकांनी या कार्याला भरगोस साह्य करावे. मोलाचा हातभार लावावा.असे प्रतिपादन सुप्रसिध्द साहित्यिका एक होता कार्व्हर कार वीणाताई गवाणकर यांनी वसई येथे आयोजित संस्थेच्या माडतिकरिता आयोजित करण्यात आलेल्या बी पॉझिटीव्ह नाटकाच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी काढले.
रस्त्यावरील निराधार वंचितांच्या पुनर्वसनासाठी जीवन आनंद संस्था करीत असलेल्या मानवतेच्या कार्याला मदतीचा एक हात देण्यासाठी निधी उभारणीकरीता बी पाँझिटिव्ह या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाटक कार्यक्रमाच्या सुरूवातीला वीणाताई गवाणकर, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.अरविंद उबाळे, प्रा.हेमंत डोंगरे, केअर संस्थेचे कोषाध्यक्ष आनंद राजू , जीवन आनंद संस्थेचे कोषाध्यक्ष राम अडसुळे, विश्वस्त नरेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यांचे हस्ते कमिटेड अँक्शन फाँर रिलीफ अँण्ड एज्युकेशन (केअर) या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्ष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
बी पाँझिटिव्ह हे नाटक समाजातील व्यक्तींना विविध कारणांनी येणारे मानसिक आजारपण आणि आत्महत्येसारख्या गंभीर विषयावर माणसाला विचाराला प्रवृत्त करते. या नाटकातील संध्या पानस्कर,चंदर पाटील, अनुप जाधव, अर्जुन शेळके , सोनम पवार,उमेश कांबळे,संदेश गायकवाड या कलाकारांनी जीव ओतून नाटक सादर केले व वसई करांची मनं जिंकली.
पुढे बोलताना वीणाताई गवाणकर म्हणाल्या ‘पणदूरच्या आश्रमात भेट दिली असता. भाजीतील हरभरे पुरेसे शिजले की नाही याची स्वतः संदिप परब हे खात्री करताना दिसले….आश्रमातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे बांधकाम इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थीनींनी एसटीने प्रवास करून निधी उभारून पुर्ण करून घेतल्याची पाटी विहिरीवर लावलेली दिसली ही आठवण वीणाताईंनी त्यांच्या भाषणातून मांडली.
बी पाँझिटिव्ह हे नाटक समाजातील व्यक्तींना विविध कारणांनी येणारे मानसिक आजारपण आणि आत्महत्येसारख्या गंभीर विषयावर माणसाला विचाराला प्रवृत्त करते. या नाटकातील संध्या पानस्कर,चंदर पाटील, अनुप जाधव, अर्जुन शेळके , सोनम पवार,उमेश कांबळे,संदेश गायकवाड या कलाकारांनी जीव ओतून नाटक सादर केले व वसई करांची मनं जिंकली.
संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रमातील भगीणी चंदा छेत्री हिची मुलगी कशिश चंदा अमर छेत्री हिने इ.१० वीच्या परीक्षेत ८६ % गुण मिळवून उज्वल यश संपादल्याबद्दल चंदा छेत्री हिचा वीणाताईं गवाणकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला
कार्यक्रम प्रसंगी केअरचे सचिव महेश घाग, जीवन आनंद संस्थेच्या विश्वस्त प्रज्ञा राणे यांची उपस्थीती होती…कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त अँड.किसन चौरे यांनी केले. अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे विश्वस्तांनी कार्यक्रमासाठी हाँलची उपलब्धता करून मोलाचे सहाय्य केले.


















