मालवण (प्रतिनिधी) : शहर तसेच तालुका परिसराला संततधार कोसळणाऱ्या पावसाने झोडपून काढले आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. यात काळसे बागवाडी येथील विजय माडये यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे.
कालपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसाचा जोर ११ जूनपर्यंत कमी अधिक प्रमाणात असाच राहील. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे, अशी माहिती येथील प्रम्शासनाकडून देण्यात आली आहे.











