जिल्हा भाजपा कार्यालयात मोदी 3.O चा जल्लोष साजरा

मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच केला जल्लोष

ओरोस (प्रतिनिधी) : देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ओरोस येथील सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवत आणि फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मंडल अध्यक्ष दादा साईल, सुप्रिया वालावलकर, समर्थ राणे, सुनील गायकवाड, अजय घाडीगांवकर, व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात प्रथमच सलग तिसऱ्यांदा भाजपाचे केंद्र सरकार देशात आले आहे. एनडीए केंद्र सरकारचे पंतप्रधान म्हणून नरेंद मोदी यांच्यासह अन्य कॅबिनेट व राज्यमंत्री शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ओरोस येथील जिल्हा भाजपा कार्यालयात करण्यात आले होते. शपथ घेताच भाजपा कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला.

error: Content is protected !!