पंतप्रधान शपथविधी सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य अविस्मरणीय – प्रभाकर सावंत

सिंधुदुर्ग ( ब्युरो न्यूज ) : नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ आज दिल्लीत घेतली. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याला सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे उपस्थित होते.नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना याची देही याची डोळा पाहणे हा अत्यंत सुखद आणि अविस्मरणीय अनुभव असल्याची प्रतिक्रिया प्रभाकर सावंत यांनी दिली. एनडीए पंतप्रधानपदी मोदी यांची एकमुखी निवड झाल्यानंतर राष्ट्रपती मुर्मु यांनी आज सायंकाळी दिल्ली येथे मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली.मोदी यांच्यासह एन डी ए च्या अन्य कॅबिनेट व राज्यमंत्र्यांनीही आज शपथग्रहण केली. या सोहळ्याला सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत याना निमंत्रित करण्यात आले होते. संपूर्ण शपथविधी सोहळा प्रत्यक्ष पाहताना भाजपाचा कार्यकर्ता म्हणून ऊर भरून आला. भाजपाच्या विचारसरणीवर तहहयात कार्यरत असल्याचे आज चीज झाल्याचे सावंत म्हणाले.

error: Content is protected !!