हमारा वक्त आया है…तुम्हारा वक्त आने नही देंगे
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : वक्त आने दो जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे या टॅगलाईन चा बॅनर शिंदे शिवसेना जिल्हा शाखेकडे लागून 24 तास उलटले नाही तोवर त्याच स्टाईलने हमारा वक्त आया है..तुम्हारा वक्त आने भी नही देंगे ! तुम्हारे इलाके में आके tumhe ही जबाब देंगे असा बॅनर कणकवलीतील छत्रपती शिवाजी चौकात लावून भाजपा कार्यकर्त्यानी प्रत्युत्तर दिले आहे. खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदनाचा शिंदे शिवसेनेने शिवाजी चौकात लावलेल्या बॅनर वरील किरण सामंत आणि जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा फोटो अज्ञाताने फाडला होता.त्यानंतर दोन दिवसांनी शिंदे शिवसेना शाखेकडे गर्भित इशारा असलेला उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योजक शिवसेना नेते किरण सामंत यांच्या फोटोसह वक्त आने दो हिसाब लेंगे हा बॅनर 14 जून रोजी लावण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर देणारा आमदार नितेश राणे कार्यकर्त्यांसह लोकसभा निवडणुकीत विजयानंतर गुलाल उधळणारा फोटो असलेला आणि हमारा वक्त आया है.. तुम्हारा वक्त आने भी नही देंगे असा इशारा देणारा बॅनर भाजपा कार्यकर्त्यांकडून लावण्यात आला आहे. त्यामुळे कणकवलीत आता भाजपा आणि शिंदे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेली धुसफूस उघड झाली असून बॅनर वॉर सुरू झाले आहे.