दि आर्ट ऑफ लिव्हिंग चे योग प्रशिक्षक संदीप नारकर यांची उपस्थिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेज खारेपाटण येथे आंतरराष्ट्रीय योग दीन उस्ताहात साजरा करण्यात आला.तर या कार्यक्रमाला कणकवली येथील आर्ट ऑफ लिव्हिंग चे योग प्रशिक्षक संदीप नारकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थित असलेले योग मार्गदर्शक प्रशिक्षक संदीप नारकर यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक संजय सानप यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.व सर्व विद्यार्थी व शिक्षकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तर योग प्रशिक्षक संदीप नारकर यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांकडून विविध योगासने व प्राणायाम करवून घेतले.
योगा दिनाच्या निमित्ताने खारेपाटण हायस्कूल व जुनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी दोन सत्रांमध्ये मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आला होता.यामध्ये योग शिक्षक संदीप नारकर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.यावेळी शालेय विद्यार्थ्या बरोबरच शाळेतील शिक्षक वर्ग यांनी देखील योग प्रशिक्षणात सहभाग घेतला.












