डागडुजी करण्याची अशितोष मुंडले यांची लेखी मागणी
तळेरे (प्रतिनिधी ) : तळेरे-पियाळी मार्गे फोंडा या रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून त्यामुळे शाळकरी मुले, रुग्ण तसेच सायकलस्वार , मोटारसायकलस्वार,वाहन चालक यांना नाहक मनस्ताप सहन करीत प्रवास करावा लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करुन निदान डागडुजी करून प्रवासायोग्य करण्याची मागणी कासार्डेतील सामाजिक कार्यकर्ते आशुतोष जगदिश मुंडले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तळेरे-पियाळी मार्गे फोंडा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.असंख्य खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असल्याने या रस्त्यावर वाहतूक करु शकत नाही. या बाबत आपण लवकरात लवकर त्याची दखल घ्यावी. तसेच नवीन रस्ता सुध्दा खराब झाला असून यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, कारण शाळेची मुले व आजारी पेशंट या रस्त्यावरुन येत जात असतात.सर्वसामान्य ग्रामस्थांच्या अतोनात होत असलेला हाल दुर करण्यासाठी रस्त्याची तत्काळ डागडुजी करण्यात यावी अशी विनंती त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे.


















