मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी असलदे ग्रामपंचायत मध्ये सुविधा कक्ष

योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन ; वाडीनिहाय लाभार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार

नांदगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी असलदे ग्रामपंचायत मध्ये सुविधा कक्ष दि. ५ जुलै २०२४ पासून असलदे ग्रामपंचायत मध्ये सुरु करण्यात येत आहे. गावातील वाडीनिहाय लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पूर्णपणे मोफत स्विकारले जाणार आहेत. या योजनेची प्रथम अंमलबजावणी डामरेवाडी या वाडीपासून करण्यात येत आहे. येथील पात्र लाभार्थी महिलांनी सर्व कागदपत्रांसहीत दि. ५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता उपस्थित रहावे. त्यानंतर पुढील नियोजन करुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल,असे आवाहन सरपंच चंद्रकांत डामरे , उपसरपंच सचिन परब व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक यांनी केले आहे.

error: Content is protected !!