वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक यांच्या निधनानिमीत्त १० जुलै रोजी कट्टा येथे शोकसभा.

चौके (प्रतिनिधी) : कट्टा येथील वराडकर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय नाईक यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता कट्टा येथील वराडकर हायस्कुलच्या सिद्धिविनायक सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा व वराडकर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज कट्टा, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुल कट्टा डॉ. दादासाहेब कला वाणिज्य महाविद्यालय कट्टा, वराडकर हायस्कुल आजी माजी विद्यार्थी तसेच संजय नाईक मित्रपरिवार यांनी ही शोकसभा आयोजित केली आहे. तरी या शोकसभेस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!