वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र वैभववाडी व माध्यमिक विद्यालय लोरे नंबर दोन च्या माध्यमातून वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम वनपाल प्रकाश पाटील, वनरक्षक विद्या जाधव, वनमजूर तात्या ढवण, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. पी. डावरे, एस.एस.गोसावी, एच.एस.सावंत, एन. बी चव्हाण, बाळू पेडणेकर यांच्या उपस्थितीत विद्यालयाच्या परिसरात नुकताच संपन्न झाला. विद्यार्थ्यांना वनविभागाच्या वतीने वृक्षाचे वाटप करून वृक्षदिंडी काढण्यात आली व त्यानंतर शाळा परिसरात उपस्थित वनविभाग कर्मचारी, शालेय कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली. ‘वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. भावी पिढीचा यात नेटाचा सहभाग असावा’ असे वनपाल प्रकाश पाटील म्हणाले. मुख्याध्यापक डावरे सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले.













