बांदा (प्रतिनिधी) : बांदा – दाणोली मार्गावर वाफोली येथे चालकाचा ताबा सुटून आयचर कॅन्टरचा रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर धडकून अपघातग्रस्त झाला. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला. सुदैवाने या अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र गाडीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालक गोव्याहून बेळगावला जात होता. भरधाव वेगात वळणाचा अंदाज न आल्याने कँटर आयचर वाफोली येथील’ त्या’ धोकादायक वळणावर रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर धडकून अपघात घडला. चालकाला किरकोळ दुखापत झाली.
वाफोली येथे पुन्हा एकदा अपघात












