वैभववाडी (प्रतिनिधी) : व्हॅगणार कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटर सायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास शहरातील रावराणे पेट्रोल पंपा समोर हा अपघात घडला. आनंद मोहन मेस्त्री (49) रा. राठीवडे गोंदीची वाडी ता. मालवण असे जखमीचे नाव आहे.
वैभववाडी येथील व्यावसायिक तावडे हा आपल्या ताब्यातील व्हॅगणार गाडी घेऊन कोकिसरेकडून वैभववाडी बाजारपेठेच्या दिशेने येतं होता. याच वेळी आनंद मेस्त्री हे आपल्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन वैभववाडी बाजारपेठेतून तरळेच्या दिशेने जात होते. पोलीस ठाण्यासमोरील रावराणे पेट्रोल पंपासमोर यांच्यात जोराची धडक दिली. यात मोटारसायकलस्वार मेस्त्री यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलीस ठाण्यासमोरच हा अपघात झाला. या अपघाताची पोलीस ठाण्यात देण्यात आली. यावेळी महिला पोलीस नाईक तनुजा तावडे, महिला काँस्टेबल आशा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी मेस्त्री यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
जखमी आनंद मेस्त्री हे गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचाराकरिता कणकवलीला नेण्यात आले आहे. या अपघाताची पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद नव्हती.












