श्रीनिवास मयेकर या विद्यार्थ्याचा भाजपा पदाधिकाऱ्यांनी शाळेत जात केला सत्कार

शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यात आला होता प्रथम

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले शहरातील बाळाजी सिताराम नाईक म्हणजेच शाळा नं. 3 चा विद्यार्थी श्रीनिवास बाबूराव मयेकर याने शिष्यवृत्ती परीक्षेत 86.57 टक्के गुण मिळवून वेंगुर्ला तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच तो शहरी विभागातून शिष्यवृत्तीधारक ठरला याबद्दल भाजपा वेंगुर्ले च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व अँड. सुषमा खानोलकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवुन सत्कार करण्यात आला.

शाळा नंबर 3 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसंन्ना (बाळू) देसाई म्हणाले कि मी या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे. कारण या शाळेचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करतात त्यामुळे ही शाळा वेंगुर्ले तालुक्यात अग्रगण्य शाळा गणली जाते.

यावेळी मुख्याध्यापक शंकर सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती कुडाळकर, उपाध्यक्ष दिनकर मयेकर, रुचीरा दाटेकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष अमृत काणेकर, निकिता मयेकर, बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ, उदय महाजन, वैभव भोसले तसेच शिक्षक राकेश देसाई, शिक्षिका मानसी वाईकर, शिक्षिका रुही जुवेकर तसेच पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!