महिलेने ओढ्यात उडी घेत वाचविले तीन वर्षाचा मुलाचे प्राण

कणकवली (प्रतिनिधी) : दैव बलवत्तर असल्यानंतर काळ आला, तरीही वेळ कशी वाचवते याचा प्रत्यय शहरालगतच्या हळवल गावात आला. तीन वर्षाचा मुलगा ओढ्यात पडला. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या महिलेने ते पाहिले व पोहता येत नसतानाही ओढ्यात उडी घेत या चिमुकल्याला वाचविले. त्या चिमुकल्याला दवाखान्यात आणण्यात आले. मात्र, सुदैवाने त्याला कोणताही त्रास झाला नव्हता. प्राप्त माहितीनुसार या छोट्या मुलाची आई घरापासून जवळच असलेल्या ओढ्याकडे गेली होती. तिच्या नकळत हा तीन वर्षांचा मुलगा ओढ्याकडे गेला. हा चिमुकला नकळत ओढ्यात पडला. त्यावेळी ओढ्याकडून जाणाऱ्या एका महिलेने हे पाहिले. तिला पोहता येत नसतानाही तिने तातडीने ओढ्यात उडी घेत त्याचा जीव वाचविला.

error: Content is protected !!