शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या मागणीनंतर फोंडाघाटमधील खड्डे बुजविण्यास सुरुवात

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठ सह मारुतीवाडी आणि फोंडा तिठा आदी ठिकाणी पडलेले खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी पिडबल्युडी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांची भेट घेत केली.आग्रे यांच्या मागणीनुसार कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी तात्काळ सर्व खड्डे पेव्हर ब्लॉक ने बुजवून रस्ता निर्धोक करणार असल्याचे सांगत त्वरित खड्डे बुजविण्याची कार्यवाही देखील सुरू केली. फोंडाघाट बाजारपेठ सह गावातील अन्य ठिकाणी खड्डे पडून वाहनचालकाना वाहन चालवताना त्याचा त्रास होऊ लागला होता.याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी तातडीने कार्यकारी अभियंता सर्वगोड यांची भेट घेत खड्डयांबाबत वस्तुस्थिती मांडून सर्व खड्डे बुजविण्याची मागणी केली. तूर्तास पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्याची डांबर अथवा पावसाळी डांबरने करणे उचित होणार नाही. त्यामुळे पेव्हर ब्लॉक ने खड्डे बुजविण्याच्या सूचना सर्वगोड यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार लागलीच रस्त्यातील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांना तात्पुरता तरी दिलासा मिळणार आहे.

error: Content is protected !!