वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी दोन्ही संघांचे केले अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत तालुकास्तरावर आज वैभववाडी येथे पोलिस ग्राउंड येथे पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या १४ व १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या दोन्ही संघांनी तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र दत्ताराम रावराणे यांनी विजयी सर्व खेळाडू, संघ व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्राचार्य बी. एस. नादकर, क्रिडा शिक्षक एस. टी. तुळसणकर, पर्यवेक्षक एस. बी .शिंदे, पी. एम. पाटील व आदी प्रशालेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.