“भगवा सप्ताह” अंतर्गत कणकवली विधानसभेच्या वैभववाडी , कणकवली, देवगड तालुक्यातील जिल्हा परिषदनिहाय घेतली आढावा बैठक
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमणे संपुर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे हे ऍक्शन मोडवर आले असून कणकवली विधानसभेमधील वैभववाडी, देवगड आणि कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद निहाय आढावा बैठका घेत रावराणे यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. भगवा सप्ताह निमित्त वैभववाडी तालुक्यातील लोरे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बैठकीने शुभारंभ करण्यात आला. कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी अतुल रावराणे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला अतुल रावराणे यांच्यासोबत तालुका प्रमुख मंगेश लोके युवा सेना जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी, महिला आघाडी प्रमुख नलिनी पाटील, विभाग प्रमुख विलास नावळे, उपतालुका संघटक अनिल नराम, माजी जिल्हा परिषद सदस्या दिव्या पाचकुडे, उपविभाग प्रमुख स्वप्निल रावराणे, उपविभाग प्रमुख सूर्यकांत परब, युवासेना विभाग प्रमुख गणेश पवार , लोरे विभागातील सर्व शाखाप्रमुख बूथ प्रमुख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.