निर्धार लढण्याचा ! विधानसभा जिंकण्याचा

शिवसेना नेते अतुल रावराणे विधानसभा मतदारसंघात भगवा सप्ताह निमित्त ऍक्टिव्ह

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार भगवा सप्ताह निमित्त फोंडाघाट येथे श्याम भुवड यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली.या बैठकीत अतुल रावराणे यांनी मार्गदर्शन करताना महायुती सरकारच्या पोकळ घोषणांचा पोलखोल केला. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भविष्यात न मिळणाऱ्या केवळ सवलती जाहीर करून जनतेची सरकार फसवणूक करत असल्याचे सांगितले. सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे प्रश्न प्रलंबित असून त्याकडे महायुती सरकार दुर्लक्ष करत असल्याचे सांगत जनतेपर्यंत पोचून महायुती सरकारची पोलखोल करा असे शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कणकवली उपतालुकाप्रमुख श्री राजू रावराणे महिला तालुकाप्रमुख माधवी दळवी उपतालुकाप्रमुख संजना कोलते शहर प्रमुख राजा पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना विभाग फोंडाघाट प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संघटनेबाबत चर्चा केली त्यावेळी सुरेश टक्के अनिल पटेल विजय जामदार शामा भुवड व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!