विद्यार्थांनी अमर रहे…अमर रहे.. मेजर कौस्तुभ राणे अमर रहे, वंदे मातरम् या घोषणांनी शालेय परिसर दणाणून सोडला
वैभववाडी (प्रतिनिधी) : ६ व ७ ऑगस्ट २०१८ मध्ये दहशतवादी विरोधी कारवाई करताना गुरेझ सेक्टर ऑपरेशन मध्ये वैभववाडी तालुक्यातील सडूरे गावचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे व अन्य तिन सैन्य शहिद झाले. या पार्श्वभूमीवर हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय , जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते मेजर कौस्तुभ राणे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाच्या वतीने मेजर कौस्तुभ राणे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अमर रहे..अमर रहे… कौस्तुभ राणे अमर रहे..! वंदे.. मातरम् या घोषणांनी प्रशालेचा परिसर विद्यार्थ्यांनी दणाणून सोडला.
यावेळी दि.६ व ७ ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या गुरेझ सेक्टर ऑपरेशन बाबत एम.एस.चोरगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना माहीती दिली. सदर कार्यक्रम प्रसंगी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक एस बी शिंदे, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील., सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही.एस.मरळकर, पी.बी.पवार आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.