माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे यांचे आयोजन
फोंडाघाट (प्रतिनिधी) : राज्य सरकार च्या वयोश्री योजनेच्या माहिती आणि अर्ज जमा करून घेण्यासाठी लोरे नं 1 ग्रा पं च्या सभागृहात आयोजित विशेष कॅम्पला जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे यांनी आयोजित केलेल्या या विशेष कॅम्प मध्ये गावातील दीडशे जेष्ठ नागरिक महिला पुरुषांचे वयोश्री योजनेचे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे भरून घेण्यात आले. यावेळी माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव, ग्रामसेवक राकेश गोवळकर, ग्रा पं सदस्य रामदास तेली, सुप्रिया रावराणे, तलाठी श्रीमती माईनकर, कृषी सहाय्यक अक्षया परब आदी उपस्थित होते.या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांच्या थेट बँकेत 3 हजार रुपये जमा होणार आहेत. विविध आरोग्यविषयक उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून वयोश्री योजनेचा लाभ देण्यात येत आहे.