चला लढूया ..विधानसभा जिंकूया

सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पुरळ जि. प. मतदारसंघात शिवसैनिकांना केले मार्गदर्शन

देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पुरळ विभागात,भगवा सप्ताह कार्यक्रमात विधानसभा संपर्क प्रमुख आदरणीय अतुल जी रावराणे साहेब यांनी उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिक यांना विधानसभा निवडणुकीत सांघिक विजय कसा मिळेल याचे बहुमूल्य मार्गदर्शन केले. कोकण म्हणजे शिवसेना, परंतु कालच्या लोकसभेला आपण आपल्या बालेकिल्यात विजय संपादन करू शकलो नाही. याची खंत आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. त्यावेळी गाफीलपणामुळे आपल्या ला पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु येत्या विधानसभेला सर्व मरगळ बाजूला झटकून सर्वांनी एक्या नव्या उमेदीने कणकवली विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा मोठ्या दिमाखात फडकऊया अश्या प्रकारे अतुल रावराणे साहेब यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी तालुका प्रमुख जयेश नर, ऊप. तालुका प्रमुख सुनील तेली, विभाग प्रमुख संदीप डोळकर, मा. जि. प. सदस्य सौ. वर्षा पवार, ऊप विभाग प्रमुख सुनील तिर्लोटकर, रामेश्वर सरपंच मोनिका टुकरुल, फणसे सरपंच अमित फणसेकर, माणिक दळवी, सचिन खडपे, सुरेश पुजारे, विभागातील सर्व शाखाप्रमुख, बुथ प्रमुख आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!