पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देऊया विजयाची भेट
शिवसेना नेते अतुल रावराणे यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत पदाधिकारी शिवसैनिकांनी कठोर मेहनत घेतली. मात्र आमचा गाफीलपणा नडला आणि विजय थोडक्यात हुकला.तळकोकणात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात झालेला पराभव पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागला आहे. येत्या विधानसभेला कणकवली विधानसभेसह कुडाळ मालवण आणि सावंतवाडी या तिन्ही विधासभा जिंकून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विजयाची भेट देऊया अशा शब्दांत सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांना केले.भगवा सप्ताह निमित्त कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी अतुल रावराणे यांनी उपस्थित पदाधिकारी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, विभागप्रमुख चंदू परब, राजू राणे, रुपेश आमडोसकर आदी यावेळी उपस्थित होते.