विनेश फोगाट Olympics मधून अपात्र ठरल्यानंतर PM मोदी भावूक

मुंबई (ब्यूरो न्यूज) : भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात पोहोचलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटला वजन अधिक असल्याने अपात्र ठरवण्यात आलं आहे. आवश्यक मर्यादेपेक्षा केवळ 100 ग्राम वजन अधिक असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आलं आहे. या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. मोदींनी घडलेल्या घटनेमुळे धक्का बसला असल्याचं आपल्या अधिकृत एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट करत म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन, “विनेश तू चॅम्पियन्समधील चॅम्पियन आहेस. तू भारताचा अभिमान आहेस. तू प्रत्येक भारतीयाला प्रेरणा दिली आहेस,” असं म्हणतं आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. “आज घडलेली घटना फार वेदनादायक आहे. मला जे काही वाटत आहे ते शब्दात मांडता आलं असतं तर बरं झालं असतं. त्याचवेळी मला तू यामधून बाहेर येण्याची क्षमता ठेवतेस याची कल्पना आहे,” असंही मोदींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे पुढे बोलताना पंतप्रधानांनी विनेशला धीर देत पुन्हा दमदार पुनरागमन करशील असा विश्वास व्यक्त केला आहे. “तू कायमच समोर आलेल्या आव्हांनाना तोंड दिलं आहे. तू यामधून अधिक भक्कमपणे पुनरागमन करशील. आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत,” असं मोदींनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!