फोंडाघाट महाविद्यालयाचे लक्षवेधी यश ‘जापसाल’ ही एकांकिका विद्यापीठस्तरीय अंतिम फेरीत दाखल

फोंडाघाट (प्रतिनिधी) : लोकमत न्यूज नेटवर्क कणकवली फोंडाघाट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये लक्षवेधी यश मिळविले आहे. मुंबई विद्यापीठ आयोजित ५७व्या आंतरमहाविद्यालयीन विभागीय सांस्कृतिक युवामहोत्सव २०२४ मध्ये फोंडाघाट महाविद्यालयाची ‘जापसाल’ ही एकांकिका विद्यापीठस्तरीय अंतिम फेरीत दाखल झाली आहे. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये झालेल्या सांस्कृतिक युवामहोत्सवातील एकांकिका स्पर्धेत प्रथमच उतरलेल्या फोंडाघाट महाविद्यालयाच्या श्री विठ्ठल सावंत लिखित ‘जापसाल’ एकांकिकेने तिसरा क्रमांक प्राप्त केला व अंतिम फेरीत दाखल झाली. तसेच महाविद्यालयातील सत्यवान गावकर याने विठ्ठल सावंत लिखित ‘एकलव्य का भूत’ या हिंदी एकपात्री अभिनय सादरीकरणातसुद्धा तिसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरीसाठी बाजी मारली आहे. ऑन द स्पॉट पेंटिंग स्पर्धेतही महाविद्यालयाच्या अनिकेत समजिसकर या स्पर्धकाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावत विद्यापीठस्तरीय अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या पदार्पणातच मिळालेल्या या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच एकांकिकाकार विठ्ठल सावंत व दिग्दर्शक शेखर गवस यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!