शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक 11 मार्च रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवलीत आ.फाटक यांचे होणार भव्य स्वागत ; मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती

उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक 11 मार्च, 2023 शनिवारी दुपारी तीन वाजता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांचा सिंधुदुर्ग दौरा नियोजित आहे. यानिमित्त कणकवली मातोश्री हॉल कणकवली येथे फाटक यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच यावेळी मंत्री दीपक केसरकर यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. ठीक तीन वाजता मातोश्री मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता व शिवसैनिकांचा मेळावा, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार, पक्षप्रवेश या मेळाव्यात होणार आहे. तरी शिवसैनिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!