50 हून अधिक महिलांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
कुडाळ (प्रतिनिधी) : कुंदे ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कुंदे ग्रामपंचायत आणि वात्सल्य सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचा 50हून अधिक महिलांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस उपसरपंच उल्का खांदारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कुंदे शाळा नंबर १च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गुलाब पुष्प व सुपारीचे रोप देऊन करण्यात आले. तसेच या निमित्ताने ग्रामपंचायतच्या वतीने महिला एसटी कंडक्टर यांचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या निलम राणे, सुनायना पवार, योगेश परब, सतीश शिंदे, माजी सरपंच सचिन कदम, ग्रामपंचायत कर्मचारी सुशील बागवे, बाबाजी परब, राजेश सावंत, बचत गट सीआरपी शामल परब, निवेदिता चव्हाण, कुंदे शाळा नंबर १च्या शिक्षिका गडये मॅडम तसेच पडवे एसएसपीएम हॉस्पिटलचे डॉ. संजय जोशी, डॉ. रिजवान बोकडे, रोशन मुंबरकर, पीआरो विष्णू गोसावी, पीआरो विलास बुडवे, वाहनचालक सुरज खरात, ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या नर्स गीतांजली शिरोडकर, तृप्ती जाधव, प्रियांका राऊळ, हिंद क्लब ओरोसचे टेक्निशियन कांचन परब, आशिषा परब तसेच वात्सल्य सामाजिक संस्था सिंधुदुर्गचे सचिव निलेश ओरोसकर, सहसचिव योगेश ओरोसकर, उपाध्यक्ष कुसुम केतकर सहकारी नेहा परब, आदी उपस्थित होते.