महिला दिन आणि भरडधान्य विशेष कार्यक्रम साजरा करणारा पियाळी बनला जिल्ह्यातील पहिला गाव
कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत पियाळीच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांसाठी ग्रामपंचायत पियाळी व शासकीय कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त भरड धान्य विशेष पाककला स्पर्धा तसेच महिलांसाठी फनी गेमचे आयोजन करण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे महिला दिन आणि भरडधान्य (तृणधान्ये) विशेष कार्यक्रम साजरा करणारा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पियाळी हा पहिला गाव बनला आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी उपसभापती श्री. संतोष कानडे, सरपंच श्री. प्रवीण पन्हाळकर, उपसरपंच श्री. संजय ढवन, पियाळी गावच्या माजी. सरपंच श्रीम. पवित्रा गुरव, ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी,मंडळ कृषि अधिकारी श्री. तोरणे साहेब, श्री. आंबर्डेकर, प्रास्तविक ग्रामसेवक संगीता पाटील यांनी केले व आभार कृषि सहायक निलेश कावले यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.












