चिंदर भगवंतगड येथील सचिन आचरेकर यांच्या घराचे छप्पर पडून नुकसान

आचरा (प्रतिनिधी) : सतत पडणाऱ्या पावसामुळे चिंदर भगवंतगड येथील रहिवाशी सचिन बाळकृष्ण आचरेकर यांच्या घराचे छत कोसळून सुमारे 20000 हजाराचे नुकसान झाले आहे. हि घटना आज 11ऑगस्ट रोजी पहाटे घडली असून ग्रामपंचायत उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य केदार (पप्पू) परुळेकर यांच्या मार्गदर्शना खाली चिंदर भटवाडी तलाठी शेजवळ पुढील नुकसान भरपाई बाबत पुढील कारवाई करत आहेत.

error: Content is protected !!