वैभववाडी युवक काँग्रेस अध्यक्ष भालचंद्र जाधव यांची रेल्वे व्यवस्थापकीय संचालकांकडे मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रोड रेल्वे स्टेशन येथे जलद एक्सप्रेस ना थांबा देण्यात यावा तसेच आरक्षण सुविधा उपलब्ध करावी.अशी मागणी वैभववाडी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. तसेच खासदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांच्याकडेही यासंदर्भात निवेदन दिले आहे.
वैभववाडी रेल्वे स्टेशन हे वैभववाडी तालुक्याबरोबरच कणकवली तालुक्यातील काही गावे तसेच देवगड तालुका राजापूर व गगनबावडा तालुक्यातील प्रवाशांना सोयीचे रेल्वे स्टेशन आहे. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले वैभववाडी स्टेशनं आहे.मात्र या रेल्वे स्टेशनवर रेल्वे तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी कणकवली रेल्वे स्टेशन वर अवलंबून राहावे लागत आहे.यामध्ये प्रवाशांचा वेळ व आर्थिक बर्दंड पडत आहे. त्यामुळे वैभववाडी रेल्वे स्टेशनवर आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आले आहे.
तसेच वैभववाडी रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असल्यामुळे या रेल्वे स्टेशनवर जनशताब्दी,ओखा,अरणाकुलम यासारख्या जलद एक्सप्रेस ना थांबा देण्यात यावा. जेणेकरून या स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची सोय होईल. सद्यस्तित स्टेशनंवर दिवा सावंतवाडी, राज्यराणी, कोकण कन्या, मांडवी एक्सप्रेस या चारच गाड्या थांबतात. मात्र वैभववाडी येते आरक्षण सुविधा नसल्यामुळे या गाड्यामध्येही वैभववाडी स्टेशनंवरील प्रवाशांना जागा मिळत नाही. त्यामुळे जनरल डब्ब्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आरक्षण सुविधा व जलद गाडयांना थांबा मिळावा.
त्याचप्रमाणे कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना अद्याप नोकऱ्या मिळाल्या नाहीत त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आले आहे. यावर कार्यवाही झाली नाही तर तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थांना घेऊन उपोषण करण्यात येईल असा इशारा जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. खासदार चंद्रकांत हंडोरे यांना निवेदन देताना भालचंद्र जाधव अशोक मुंडेकर दिलीप नारकर संतोष वळंजु प्रशांत रूपवते संतोष पालकर किशोर सुतार प्रभाकर इस्वलकर आदी उपस्थित होते.











