देवगड (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या कृषिदूतांनी मुटाट (देवगड) येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेततळे प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांमध्ये शेततळ्याच्या उपयोगा संबंधी जागृती होण्यासाठी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
या उपक्रमांतर्गत कृषिदुतांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेततळे तयार करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे दाखविली. आपत्कालीन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी, मत्स्यसंवर्धनसाठी तसेच उन्हाळ्यात पाण्याअभावी होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासठी शेततळे महत्त्वाचे ठरते. यावेळी कृषिदुत आदित्य विरकर, धिरज मस्के,अंगराज मोरे, पवनराज लेंडवे,गणेश माने, पृथ्वी रेड्डी , प्रदिप पाटिल, हर्षवर्धन रणखंबे, राजुपेट्टा राजू,प्रसाद देसाई इत्यादी यांनी प्रा.वाडकर सर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. यासाठी कृशिदूतांनी २मी,१मी,२फूट असे मोजमाप घेऊन प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच सरकारची शेततळ्यासाठी असलेली मागेल त्याला शेततळे या योजनेबद्दलही सखोल माहिती शेकऱ्यांपर्यंत पोहचवली.शेततळे तयार करण्यासाठी लागणारी जमीन , शेततळे तयार करतेवेळी येणाऱ्या अडचणी,शेततळे तयार करताना घ्यावयाची दक्षता, तयार करण्यासाठी येणारा खर्च,तसेच सरकार मार्फत मिळणारे अर्थसहाय्य याचीही माहिती शेकऱ्यांना दिली.या प्रात्यक्षिकावेळी गावाचे उपसरपंच किरण प्रभू , कृषिमित्र सुरेश प्रभू तसेच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे विशेष तांत्रिक प्राचार्य डॉ .होळकर सर , समन्वयक अधिकारी प्रा. गायकवाड टी. बी. सर, कार्यक्रम अधिकारी प्रा.कदम सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रात्यक्षिकाचा फायदा निश्चितच गावातील शेतकऱ्यांना शेततळे करण्यासाठी होईल अशी प्रतक्रियाही गावातील शेतकऱ्यांनी दिली.












