शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती साजरी

तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले छत्रपतींना अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजरा होणाऱ्या जयंती निमित्त कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी आली. शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी छत्रपतींच्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, बाबू आचरेकर, निलेश तेली, सुनील हरमलकर, अभिजीत सावंत, दीपक गावकर, दीपक राऊत आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!