महायुती सरकार अपयशी ; काळी फीत बांधून शिवसेनेने केला निषेध

वैभववाडी (प्रतिनिधी) : बदलापूर, कोल्हापूर, लातूरसह राज्यात अनेक ठिकाणी चिमुकल्यावर होत असलेल्या अत्याचाराला न्याय देण्यात सरकार असमर्थ ठरले आहे. असा आरोप करीत सरकारचा उबाठा सेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर हाताला काळी फीत बांधून निषेध करण्यात आला.

यावेळी उप जिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालूकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदिप सरवणकर, युवसेना जिल्हा चिटणीस  स्वप्नील धुरी ,युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर,सरपंच जितू तळेकर,विभाग प्रमुख  गणेश पवार ,उपविभाग प्रमुख यशवंत गवणकर, उपविभाग प्रमुख -स्वप्नील रावराणे ,नगरसेवक रंजीत तावडे ,सुनील रावराणे,संदेश सुतार, जयेश पवार,योगेश गुरव,बाळा पाळये, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपजिल्हा प्रमुख शिंदे म्हणाले, आज राज्यात कायदा व सुव्यस्था शिल्कक राहिली नाही. हे सरकार महिला व मुलींच्या सुरक्षे बाबत गंभीर नाही. त्यामुळे अशा निंदनीय घटना घडत आहेत. यातील आरोपीवर कडक कारवाई केली पाहिजे. असे सांगितले.

तर संदीप सरवणकर म्हणाले, या देशाला डॉ बाबासाहेब आंबेडकरानी संविधान दिले आहे. जे संविधान येथील सर्वसामान्य माणसाचे रक्षण करणारे आहे. मात्र सध्या देशात लोकशाहीची मुसकटदाबी सुरु आहे. मुलांना शाळेत पाठवतांना पालकांना भीती वाटत आहे. महिला सुरक्षित नाहीत. हे सरकारचे अपयश आहे. त्यांना वाटत आहे आम्ही महिलांना 1500 रुपये देऊन निवडून येऊ अशी भावना आहे. जनता त्यांना त्यांची जागा नक्की दाखवेल. या सर्व घटनांचा आम्ही निषेध करीत असल्याचे सरवणकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!