वैभववाडी शहर भाजपा पुरस्कृत दहीहंडी ला ढोल ताशा,डीजे च्या धुणवर तरुणाई थिरकली
वैभववाडी (प्रतिनिधी) : गोविंदा रे गोपाळा… यशोदेच्या तान्ह्या बाळा.. तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा… गोविंदा रे गोपाळा.. अशा जयघोषात वैभववाडी तालुक्यात गावागावात बालगोपालांनी दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे उभे करीत दहीहंडी फोडल्या. तर तालुक्याचे मुख्य आकर्षण असलेली भाजपा पुरस्कृत वैभववाडी शहरातील दहीहंडी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
दहीहंडी उत्सवानिमित्त तालुक्यात गावागावात आबाल वृद्धांमध्ये उत्साह दिसून येत होता. आकर्षक बक्षिसे असलेल्या दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या या दहीहंड्या गावातीलच गोविंदा पथकाने मानवी मनोरे रचित फोडला. ढोल तशाच्या तालावर व डी जेच्या धुणवर तरुणाई थिरकताना पाहायला मिळाली.
वैभववाडी शहरात भाजपाच्या वतीने 1 लाख 11 हजार 111 रुपयाची दहीहंडी बांधण्यात आली होती. ही दहीहंडी कोण फोडणार याची उत्सकता प्रेक्षकांमधून होती त्यामुळे ही दहीहंडी पाहण्यासाठी सायंकाळी तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कोल्हापूर येथील तुफान ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.












