छ. शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ आप चे आंदोलन

महाराष्ट्र प्रदेश कमिटी पदाधिकारी होणार सहभागी

शिवपुतळा दुर्घटना प्रकरणात आप ची आंदोलनाची वेगळी चूल

कणकवली (प्रतिनिधी) : मालवण मधील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महराजांचा पुतळा कोसळून दुर्घटना घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी व संबंधित कंत्राटदार, अधिकाऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी दिली आहे. हे आंदोलन बुधवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ४ यावेळेत राजकोट किल्ला येथे होणार आहे. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कमिटी पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले. तरी जिल्ह्यातील आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शिवप्रेमी यांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!