नांदगाव (प्रतिनिधी) : असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात कौटुंबिक प्रवाहातून बाहेर पडलेल्या आजी आजोबांचे संगोपन दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचारी व संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये करत आहेत.असे हे हिंदू पारंपारिक सन दिविजा वृद्धाश्रमात मोठ्या उत्साहाने व आनंदाने आजी आजोबा सोबत साजरे करत असतात.
श्रावण महिन्यातील गोकुळाष्टमीचा उत्सव आज दिविजा वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला.त्या प्रसंगी दिविजा वृद्धाश्रमातील आजोबा श्री गोपीनाथ किनळेकर यांना श्रीकृष्ण तर आश्रमातील आजी श्रीम रत्नप्रभा नरसाळे यांना राधाच्या वेशभूषेत आश्रमाचे कर्मचारी सौ अनुजा आचरेकर व सौ मंजिरी राणे यांनी नटवले.आश्रमात श्रीकृष्ण पूजेचे आयोजन केले गेले त्यानंतर आश्रमातील सगळ्या आजोबांनी गोविंदा रे गोपाळाचा जल्लोष करत आश्रम परिसर दणाणून सोडला.त्यानंतर आजी आजोबांचे सामुहिक नाच झाले.अशातच घोलू विजया हुंबर्डेकर यांनी कलाकार भगवान दादा यांच्या चलो मटकी फोडो या गाण्यावर भगवान दादाच्या स्टाईलवर नाच केला.सर्व आश्रम परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण झाले होते आणि शेवटी आश्रमातील आजी आजोबांनी मिळून दहीहंडीचे थर रचून श्रीम रोहिता शिरोडकर वय ६५ या आजीने दहीहंडी फोडली.त्यानंतर काकडी केळ्याचा नैवद्य सर्वांनी घेतला.
आशाप्रकारे वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबांनी मिळून गोपाळकाल्याचा कार्यक्रम दिविजा वृद्धाश्रमात साजरा केला.या दहीहंडी साठी असलदे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आलेल्या सर्व पाहुण्यांचे संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.












