कासार्डेतील प्रमोद जठार मित्रमंडळ दहीहंडी उत्सवात महाकाली गोविंद पथक आडिवरे राजापूर सात थरांची सलामी

तळेरे (प्रतिनिधी) :  कणकवली तालुक्यातील कासार्डे येथिल प्रमोद जठार मित्रमंडळ आयोजित दहीहंडी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोविंद पथकांनी सलामी देत आर्केस्ट्रा, डी.जे.च्या तालावर बोल बजरंग बली की जय, ढाक्कुमाक्कुम गोविंदा आला रेच्या जयघोषात मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.यावेळी महाकाली गोविंद पथक आडिवरे राजापूराने सात थरांची सलामी देत उपस्थितांची मने जिंकली. 

यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक प्रमोद जठार, माजी जि.प.सदस्य संजय देसाई, माजी सभापती प्रकाश पारकर,प्रमोद जठार मित्रमंडळ अध्यक्ष प्रसाद जाधव,तंटामुक्त अध्यक्ष संजय नकाशे,शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये,असलदे उपसरपंच सचिन परब, शांताराम जाधव, बबलू सावंत, एकनाथ पवार, संदिप बांदिवडेकर, सुधीर देवळे, संजय कुदळे, बाबू घाडीरज्जाक बटवाले, याच्यासह कासार्डेतील मानकरी व रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळेस सायंकाळपर्यंत गांगोमाऊली फोंडाघाट, न्यू हनुमान दिवटेवाडी राजापूर, धोपेश्वर राजापूर, हनुमान प्रसन्न खडपेवाडी राजापूर, महाकाली गोविंद पथक आडिवरे राजापूर, निनादेवी गोविंद पथक कुणेरी राजापूर यानी पाच व सहा थरांची सलामी देत उपस्थित रसिकांचे मन जिंकले.त्याना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

error: Content is protected !!