बालविर चेंबूर गोविंदा पथकाने फोडली 5 लाख 55 हजार 555 रुपयांची दहीहंडी

आमदार नितेश राणे पुरस्कृत कोकणातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाला प्रेक्षकांची भरभरून 

कणकवली : आमदार नितेश राणे पुरस्कृत 5  लाख पंचावन्न हजार 555 रुपयांची प्रथम पुरस्कार असलेला दहीहंडी उत्सव कणकवलीत मोठा उत्साहात संपन्न झाला.बालवीर गोविंदा पथक चेंबूर या पहिल्या बक्षिसांचे मानकरी ठरले.

पभारतीय जनता पार्टी कणकवली आयोजित आणि आमदार नितेश राणे पुरस्कृत या  दहींडी उत्सवाला केंद्रीय  माजी मंत्री खासदार नारायण राणे,सिने अभिनेता सोनू सूद,माजी खासदार नीलेश राणे,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला.

यावेळी अनेक गोविंदा पथकाने पाच, सहा, सात थर लावले.त्यात देव वेतोबा वेताळ बांबर्डे,७ थर,नवलाई देवी ७ थर, फोंडाघाट येथील  गांगो माऊली पथकाने ६ आणि सात अशा वेगवेगळ्या मानवी मनोऱ्यांना थरार निर्माण केला.सिंह गर्जना,बांदा पथकाने ६ थर,श्रीराम जामसंडे,६ थर,हनुमान पथक खडापे वाडी राजापूर,६ थर असे थर लावले इतर संघांनी सुद्धा अशाच थरांवर थरार रचले त्यात कोळंबा नांदगाव,नवला देवी राजापूर, शिव स्वराज्य वानिवडे, नवलाई देवी  थर,शिवस्वराज्य पावणाई, कोळोशी गोविंदा पथक,अशा संघांनी सहा,पाच असे थर लावून थरार निर्माण केला. यात महिला गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. त्याच्या मानवी मनोऱ्यांनचा थरार हृदयाचे ठोके चुकवणारा होता.

error: Content is protected !!