राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात गुणवंत खेळाडूं व शाळांचा गुणगौरव…
तळेरे (प्रतिनिधी) : हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा करण्यात केला जातो राज्यामध्ये एकूणच खेळाडूंच्या प्रगतीचा विचार केला तर राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी आहे. शासनाकडून सातत्याने खेळाडूंचा करण्यात आलेला विचार आणि देण्यात येणाऱ्या सोयी सुविधाचा परिणाम म्हणजेच आपण राष्ट्रीय पातळीवर आपले प्रथम क्रमांकाचे स्थान कायम राखले आहे.२९ ऑगस्ट रोजी राज्यात तसेच देशांमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम घेतले जातात. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात क्रीडाक्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या विविध शाळांचा तसेच गुणवंत राष्ट्रीय खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शनाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला कासार्डे शिक्षण संस्थेचे स्कुल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर यांच्या शुभहस्ते तर ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला गुणवंत क्रीडा मार्गदर्शक सोमनाथ गोंधळी यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम विद्या शिरस या उपस्थित होत्या.याप्रसंगी क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड,सचिन रणदिवे,क्रीडा मार्गदर्शक श्रीम.माधुरी घराळ,सिध्दांत रायकर,मंगेश माने व आशिष सावंत आदी कार्यालयीन कर्मचारी तसेच अनेक विद्यालयाचे मुख्याध्यापक व संस्था पदाधिकारी व क्रीडा शिक्षक व गुणवंत खेळाडूही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नुतन क्रीडा मार्गदर्शक श्रीम.श्रध्दा तळेकर यांनी केले.दरम्यान विविध शाळा व संस्थापकांच्यावतीने कासार्डे विकास मंडळ,मुंबई शिक्षण संस्थेचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे यांनी मनोगत व्यक्त करताना शासनाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करून क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या शाळांचे आणि खेळाडुंचे विशेष अभिनंदन केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक आनंद सुरेकर यांनी केले तर शेवटी आभार कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी मानून पारितोषिक वितरण समारंभाची सांगता केली.
कोकणातही टॅलेंट खेळाडू….
मिशन लक्षवेध ही योजना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील खाजगी प्रशिक्षण केंद्राचे बळकटीकरण तसेच खेळाडूंना पूरक आहार, स्पर्धा सहभागासाठी अर्थसहाय्य, क्रीडा साहित्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. या योजना जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून सर्वोपरी प्रयत्न केले जात असून याकामी खेळाडू आणि प्रशिक्षकामधूनही त्याला सहकार्य मिळत आहे.कोकणात अनेक टॅलेंट खेळाडू आणि मेहनती क्रीडा शिक्षक आहेत, त्यामुळे नैसर्गिक प्रतिकुल परिस्थितीतही अनेक गुणवंत खेळाडू घडले जात आहेत.
विद्या शिरस
जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग
क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शाळांचा गुणगौरव!
जय गणेश इंग्लिश मीडियम मालवण, कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे ता.कणकवली, सैनिक स्कूल अंबोली ता. सावंतवाडी, डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस ता. कुडाळ, कुडाळ हायस्कूल कुडाळ, राणी पार्वती देवी हायस्कूल एज्युकेशन सावंतवाडी, कणकवली विद्यामंदिर प्रशाला कणकवली,न.शा. पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड,व कणकवली कॉलेज कणकवली या शाळांना क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल शासनाच्यावतीने धनादेश,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शाळांचे संस्थापक,मुख्याध्यापक,क्रीडाशिक्षकांचा जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.विद्या शिरस यांनी प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गुणगौरव केला.
गुणवंत खेळाडू व क्रीडा शिक्षकांचाही सन्मान
यावर्षी या सत्कार सोहळ्यात आयुष दत्तप्रसाद पाटणकर (राष्ट्रीय रायफल शूटिंग खेळाडू), पल्लवी शिंदे ( राष्ट्रीय ज्यूदो खेळाडू) व सुरज देसाई ( राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू) यांचाही गुणगौरव करण्यात आली.तसेच सरस्वती विद्यालय कुडासे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक सोमनाथ पंडित गोंधळी यांना जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.त्यांचा धनादेश,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष बाब म्हणजे या गुणवंत शाळांमधून कुडाळ हायस्कूल,कुडाळ आणि कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाताने सर्वाधिक पारितोषिके पटकावली आहेत.












