भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची शिष्टाई
सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 734 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेले पाच महिने रखडलेले वेतन मिळावे या मागणीसाठी सर्व कर्मचारी जि. प. भवनात सोमवारी एकवटले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या कर्मचाऱ्यांसोबत मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांची भेट घेत केलेल्या शिष्टाईमुळे या ग्राप कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला. गणपती सणापूर्वी, या येत्या दोन दिवसात जिल्हा परिषदे मार्फत या कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांचे वेतन देण्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
जिल्ह्यातील ४३२ ग्रामपंचायत मध्ये ७३४ ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन यापूर्वी सीएससी मार्फत थेट होत होते. मात्र राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा परिषदेमार्फत करण्याचे आदेश दिले होते.एप्रिल मे आणि जुलै अखेरचे वेतन आता देण्यात येणार असून जून व ऑगस्ट अखेर पर्यंतच्या वेतनासाठी आवश्यक असलेला सुमारे ६७ लाखांचा निधी शासनाकडे तातडीने मागणी करण्यात येणार आहे
गणेश चतुर्थी पूर्वी एप्रिल मे व जून या तीन महिन्याचा अदा करण्यावर निर्णय झाला. मात्र या सर्व कर्मचाऱ्यांचे एकावेळी पेमेंट अदा करण्यासाठी झेडपी आपल्या सिस्टीमचा वापर करून प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार अदा करण्याचा निर्णय झाला.या प्रलंबित राहिलेल्या पगारासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सोमवारी जिल्हा परिषदेत एकवटले होते. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी यात लक्ष घातल्यामुळे व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्याशी चर्चा घडवून आणल्यामुळे गणपतीपूर्वी या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. व त्यामुळे येत्या दोन दिवसात या कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या बँक खात्यात जमा होतील असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याच्या राहिलेल्या पगारासाठी आवश्यक असलेल्या निधी शासनाकडून तातडीने मागवावा व याबाबत आपण पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधून आवश्यक निधी शासनाकडून प्राप्त करून घेऊ अशी ग्वाही प्रभाकर सावंत यांनी या कर्मचाऱ्यांना दिली.












