लोरे नं. २ येथे शिवसेना शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या तिथीनुसार जयंतीचे औचित्य साधून लोरे नंबर २ शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात मोठ्या उत्साहाने शिवप्रेमी, शिवसैनिकांनी सहभागी होऊन शिवछत्रपतींना अभिवादन केले.

यावेळी शिवसेना सरपंच विलास नावळे, उपसरपंच रुपेश पाचकुडे, माजी उपसपंच नाना रावराणे, शाखा प्रमुख धाकोजी सुतार, सोशल मीडिया तालुका प्रमुख रविंद्र रावराणे, अनिल नरांम, देऊ मांजलकर, सुरेश नाचनेकर, सुभाष कुडतरकर, अनंत आग्रे, निकिता आग्रे व अनेक शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!