चौके (प्रतिनिधी) : चौके वावळ्याचे भरड येथील ज्येष्ठ ग्रामस्थ तसेच नावाजलेले भजनी बुवा बाळकृष्ण राघो परब उर्फ बाळा परब (62) यांचे शनिवारी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, दोन विवाहीत मुली,जावई नातवंडे असा परिवार आहे. चौके वावळ्याचे भरड येथील भराडी कला क्रीडा विकास मंडळाचे गेली 47 वर्ष भजनी बुवा होते.शांत संयमी स्वभाव व आपल्या सुंदर गायनामुळे चौकी पंचक्रोशीत त्यांची ओळख होती.चौके स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी
चौके ग्रामस्थ तसेच वावळ्याचे भरड भराडी कला क्रीडा विकास मंडळ यांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.












