वैभववाडीत भाजपाच्या लाभार्थी सन्मान यात्रेचा शुभारंभ

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथे भाजपाच्या लाभार्थी सन्मान यात्रेचा शुभारंभ पार पडला. राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनांची माहिती व जनजागृती अधिक गतीने व्हावी यासाठी भाजपाच्या वतीने लाभार्थी सन्मान यात्रा आज आयोजित करण्यात आली. विविध योजनांच्या माहितीचे २० स्टॉल उभारण्यात आले होते. या यात्रेत ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाचे स्टाॅल ही उभारण्यात आले होते.

या यात्रेत पीएम किसान, लाडकी बहीण, वयोश्री, महिला सक्षमीकरण, एसटी सवलत, कृषी योजना, विज बिल माफ, घरेलू कामगार, बांधकाम कामगार योजना, तीर्थ दर्शन योजना अशा विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली. या यात्रेत लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, नेहा माईणकर, संजय सावंत,  प्राची तावडे, उद्योजक विजय तावडे, शारदा कांबळे, यामिनी वळवी, प्रकाश सावंत, अतुल सरवटे, दत्ताराम सावंत, अतुल नारकर व भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!