शैक्षणिक साहित्य वाटपाने केला वडिलांचा स्मृतिदिन साजरा

विजयश्री औंधकर कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम

रत्नागिरी (प्रतिनिधी) : कणकवली येथील सेवानिवृत्त तहसीलदार कै.मनोहर सिताराम कुबडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची कन्या विजयश्री विलास औंधकर यांनी कुटुंबियांच्या वतीने सह्याद्रीनगर जिल्हा परिषद शाळा रत्नागिरी येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. यावेळी विलास औंधकर , प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. आपले वडील सेवानिवृत्त तहसीलदार मनोहर कुबडे ह्यांना शिक्षणाप्रति प्रचंड आस्था होती. मुलांनी उपलब्ध शैक्षणिक साहित्याचा सुयोग्य वापर करून आपल्या ज्ञानकक्षा वाढवत जीवनात यशस्वी व्हावे अशी त्यांची धारणा होती. वडील कै. मनोहर कुबडे यांच्या विचारांचा वारसा जपत शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप केल्याचे औंधकर म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!